रमेश : “ सुप्रभात सूरज “
सूरज : “ सुप्रभात रमेश ,काय कशी झाली दिवाळी ? ही दिवाळी फारच चांगली गेली ह्या कोविड प्रकरण नंतर”
रमेश : “ हो ही दिवाळी खरंच छान आणि वेगळी होती , मी ह्या वेळी माझ्या कुटुंबाबरोबर वेळ व्यतीत केला आणि माझ्या आणखीन मोठ्या कामाच्या ठिकाणच्या कुटुंबाबरोबर एक खास प्रकारे आम्ही दिवाळी साजरी केली. आम्ही एक ट्रेनिंग ठेवले होते. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ विरोधी कायद्या POSH संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांसाठी ठेवले होते ट्रेनिंग.”
सूरज : “ लैंगिक छळ कामाच्या ठिकाणी , POSH हे काय ?
रमेश :” कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ विरोधी कायदा POSH हा सरकारने आणला आहे . POSH चा अर्थ Prevention of Sexual Harassment at workplace असा आहे. ह्या कायद्या नुसार कामाच्या ठिकाणी असणाऱ्या स्त्री कर्मचऱ्यांची सुरक्षा ही मालकाची जबाबदारी आहे . त्याने ह्या कायद्या अंतर्गत येणाऱ्या सर्वे आवश्यक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे, जसे की ,
१. तुमच्या कडे १० अथवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर एक अंतर्गत समिति स्थापन करणे गरजेचे आहे .
२. तुमच्या कर्मचाऱ्याना ह्या कायद्या विषयी माहीत करून देण्यासाठी ट्रेनिंग , प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे.
३. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या कायद्यातील सर्व आवश्यक बाबी ची पूर्तता डिसेंबर अखेर पूर्ण करणे व त्याचा अहवाल ( रीपोर्ट) जानेवारी अखेर पर्यन्त देणे बंधनकारक आहे .
सूरज : “ पण मला पण हे करावे लागेल का ?”
रमेश : “ जर तुझ्याकडे १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर तुझ्या कडे POSH अंतर्गत समिति स्थापन करणे गरजेचे आहे . तसेच ती समिति आहे याचा रीपोर्ट अहवाल सरकारला देणे गरजेचे आहे नाहीतर तुला ५०,०००/- पर्यन्त दंड होऊ शकतो आणि जर तु काही न करता दुर्लक्ष केलेस तर तुझे बिझनेस लायसेंस पण कॅन्सल केले जाऊ शकते . त्यामुळे ह्या कडे दुर्लक्ष करू नको .”
सूरज : “ अरे बापरे माझ्याकडे १५ आहेत , म्हणजे मला सर्व करावे लागेल , मला सांग हे कोण सांगेल आणि करून देईल?”
रमेश : “ नको काळजी करू माझ्या माहितीचे एक सल्लागार आहेत त्यांचा कॉनटॅक्ट देतो.”