कंपनी व प्रमोटर

नमस्कार ,
आज आपण कंपनी विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
गेल्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की कंपनी म्हणजे कायद्याने निर्माण केलेला एक माणूस . जो डायरेक्टर च्या मदतीने काम करतो . कंपनी स्वतः काही कार्य करू शकत नाही त्यामुळे आपल्या वतीने काम करण्याचा अधिकार कंपनी प्रमोटर व प्रथम डायरेक्टर ना देते .
डायरेक्टर , शेअर होल्डर कंपनी चे मालक असतात पण कंपनी चे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते .
कंपनी स्थापन करण्यासाठी जे त्या कंपनी मध्ये गुंतवणूक करणार आहेत त्यांना त्या कंपनीचे पालकत्व स्वीकारावे लागते ज्यांना प्रमोटर म्हणले जाते .
कंपनी किती भागभांडवल (शेअर्स) उभे करणार आहे, कंपनी कोणत्या प्रकारचा उद्योग व्यवसाय करणार आहे , कोणत्या प्रकारची कंपनी स्थापन करायची आहे ह्या सर्व गोष्टी प्रमोटर ने ठरवणे गरजेचे असते . कंपनी साठी व्यवसायाची जागा उपलब्ध करणे , कंपनी चे योग्य नाव ठरवणे , व कायद्याने बंधनकारक असलेल्या गोष्टी करणे ही सुद्धा प्रमोटर ची जबाबदारी असते.
कंपनी ही आपले पाल्य आहे असे समजून जसे अज्ञान पाल्यासाठी पालक योग्य ते करतात तसेच कंपनी साठी करावे लागते .
कंपनी अस्तित्वात आल्यावर कायद्यानुसार योग्य ते नियोजन करणे व आवश्यक फॉर्म भरून पूर्तता करणे ही जबाबदारी प्रमोटर व प्रथम डायरेक्टर वर असते.
Visits: 422

कंपनी व कंपनीचे विविध प्रकार

कंपनी सचिव कोण ह्या विषयी आपण वाचले .आता कंपनी म्हणजे कोण ते पाहूया
कोणालाही नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर सोपा मार्ग निवडला जातो. प्रोपरायटर अथवा भागीदारी अर्थात पार्टनरशीप. त्याचे अजून एक कारण म्हणजे कंपनी , एलएलपी ह्या विषयी व त्याच्या फायद्या विषयी माहिती नसते . व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या परवानग्या घ्याव्या लागतील या बाबत पण संभ्रम असतो . आपली वस्तू अथवा सेवा ह्यासाठी व्यायासायचा कोणता प्रकार योग्य असेल ह्या विषयी काही माहिती नसते किंबहुना कंपनी कायदा व इतर कायदे नियम ह्यांची माहिती नसते त्यामुळे त्याबाबत भीती पण असते.
तर हेच कायदे सोप्या भाषेत सांगायचा हा प्रयत्न
कंपनी  : कंपनी म्हणजे कायद्याने निर्माण केलेला एक माणूस.
🔹ज्याला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्त्वआहे आणि ते कायम असते.
🔹ज्याला स्वतःचे नाव आहे.
🔹ज्याला स्वतःचे शरीर नाही पण ईतरांच्या मदतीने विविध कामे करु शकतो . *डायरेक्टर* कंपनी वतीने काम करतात.
🔹शेयर होल्डर्स कंपनीचे मालक असतात पण ते व कंपनी भिन्न व्यक्ती असतात. 
🔹 शेयर होल्डर् बदलेल पण कंपनी कायम असते जोपर्यंत कार्य करणे थांबत नाही.
Visits: 231

आय सी एस आय  व कंपनी सेक्रेटरी

नमस्कार ,
या वेळी व्यक्त व्हायला जरा उशीर झाला कारण गौरी गणपती पूजन , नवरात्री उत्सव ह्या सगळ्या धामधुमीत आणि काही अडथळ्यांची शर्यत पूर्ण करता करता आज विजयादशमी चा सोनेरी दिवस उजाडला आलेल्या अडथळ्यांना पार करून त्यावर विजय मिळवणे हे आजच्या दिवशी माझ्यासाठी सीमोल्लंघन आहे .
आधीच्या ब्लॉग मध्ये कंपनी सचिव ह्या विषयी माहिती दिली आता कंपनी सचिव / कंपनी सेक्रेटरी ह्या विषयी अधिक माहिती आज जाणून घेऊ या.
कंपनी सेक्रेटरी/ कंपनी सचिव
कंपनी सेक्रेटरीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला अनेकांनी हा प्रश्न विचारला की ही कोणत्या विद्यापीठाची पदवी आहे? ह्याचे महाविद्यालय कुठे असते?
कंपनी सेक्रेटरी ही कोणत्याही विद्यापीठाची पदवी नाही. कंपनी सेक्रेटरी हे एक प्रोफेशनल क्वालीफिकेशन आहे . ही अशी एक विशेष योग्यता आहे जी आयसीएसआय  या  संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मिळवता येते.
आय सी एस आय हे विद्यापीठ नाही. ती एक संस्था आहे जी संसदे ने संमत केलेल्या कायद्या अंतर्गत अस्तित्वात आलेली आहे.
ही संस्था कंपनी सेक्रेटरी च्या परीक्षा घेते , त्या बाबत मार्गदर्शन करते. अतिशय कठीण अशी परीक्षा पद्धती असते त्यामुळे  उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३ ते ४ टक्के आहे . नवी दिल्ली येथे संस्थेचे मुख्यालय आहे . तसेच स्थानिक पातळीवर चॅप्टर आहेत . ज्या मार्फत ही संस्था काम करते  म्हणून कोणतेही महाविद्यालय ह्या साठी नाही.  स्थानिक चॅप्टर सर्व कामकाज पाहते.
कंपनी मंत्रालय यांचे तर्फे कंपनी कायदा अंतर्गत नियमांचे नियमन केले जाते आय सी एस आय ही मदत करते.
आजच्या साठी इती शब्द मर्यादा.
आता लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग चे निमित्ताने
दसऱ्याच्या शुभेच्छा
Visits: 624

कंपनी सचिव

आजही मला तो दिवस आठवतो जेव्हा बऱ्याच दिवसांचा अथक परिश्रमानंतर मी कंपनी सेक्रेटरी ची परीक्षा पास झाल्याचे प्रशस्तीपत्रक मिळाले. माझी सासर माहेर ची दोन्ही कुटुंबे अतिशय आनंदी झाली होती ,  का होणार नाहीत आम्ही सर्वांनी पाहिलेले एक मोठे स्वप्न पूर्णत्वास गेले होते.

पण खरी परीक्षा आता सुरु झाल्याची जाणीव मला झाली जेव्हा काही लोकांनी मला कंपनी सेक्रेटरी ची परीक्षा म्हणजे नक्की कोणती परीक्षा पास झालीस असे विचारले.तेव्हा जाणवले की cs ह्या प्रोफेशन ला त्याची योग्य ती ओळख मिळवून देणे गरजेचे आहे.म्हणून त्याचा एक भाग म्हणजे हा ब्लॉग प्रपंच
आपल्या पैकी बऱ्याच जणांना C A माहिती असतो कारण इन्कम टॅक्स नावाच्या बागुलबुवा पासून कसे वाचायचे किंवा त्याला योग्य तऱ्हेने कसे हाताळायचे याचे मार्गदर्शन  करत असतो . सर्वसामान्य माणसाचा   संपर्क नसतो , कंपनी , शेअर बाजार यांच्याशी संपर्क असणाऱ्यांना कंपनी सेक्रेटरी विषयी थोडी फार माहिती असते.
पूर्वी राजे लोक त्यांचा कडे सचिव नावाचे पद ठेवत असत . ते पद सांभाळणारा माणूस मुख्यत्वे राजाचा पत्र व्यवहार व दैनंदिन व्यवहारात लक्ष द्यायचा .पण आता कंपनी सेक्रेटरी ( कंपनी सचिव) चे काम त्याहून महत्त्वाचे झाले आहे.कोणतीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक कंपनी मध्ये कंपनी सेक्रेटरी ची एक महत्वाची भूमिका असते . कंपनी च्या अती महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये कंपनी सेक्रेटरी ची गणना होते व तशीच अतिशय महत्वाची जबाबदारी असते.
पुढील ब्लॉग मधे आपण ह्या विषयी अधिक जाणून घेऊ या.
Visits: 774
error: Content is protected !!
WhatsApp chat