एल एल पी आणि बरच

उशीरा पोस्ट केल्याबद्दल दिलगीर आहोत.कोरोना अतिरिक्त कामामुळे तारीख चुकली.

सुदामा: ” अरे मित्रा श्रीहरी आज भेटता येईल का रे तुझ्या त्या मित्राला  आपलं बोलणं झालं आणि लॉकडाऊन सुरू झाला बघ  पण आता थोडी बाहेर पडायला सुरुवात होते आहे तर पहा विचारून”
श्रीहरी: ” हो हो नक्कीच भेटू शकतो आम्ही दोघे ही भेटणारच होतो ये मग उद्या”
सुदामा व श्रीहरी दुसऱ्या दिवशी त्या मित्राच्या घरी जातात .
धनंजय: “या या मी तुमचीच वाट पाहत होतो:.
श्रीहरी : “हा माझा जुना मित्र सुदामा , ह्यालाच एल एल पी संबंधी माहिती हवी होती” .
धनंजय : “हो नक्कीच सांगतो चला चहा घेता घेता बोलू”.
“तर मी आणि माझ्या एका मित्राने एल एल पी सुरू केली आहे . ज्या  मधे आम्ही दोघे डेसीग्नेटेड पार्टनर आहोत म्हणजे आम्ही दोघे एल एल पी चे जबाबदार पार्टनर आहोत . ह्या व्यतिरिक्त अजून एक मित्र पण पार्टनर आहे पण तो नुसताच पार्टनर आहे .
म्हणजे जसे कंपनी मध्ये फक्त शेअर होल्डर असतात तसे , आणि आम्ही दोघे जसे डायरेक्टर शेअर होल्डर .”
“आम्ही तिघांनी आपल्या कुवतीप्रमाणे पैसे जमा केले व ते आमचे  एल एल पी चे जमा भांडवल झाले ज्याला कंट्री ब्युशन म्हणतात . आम्ही तिघांनी आपापला नफ्यात वाटा किती हे ठरवले तसेच इतर सर्व आवश्यक बाबी विचारात घेऊन एल एल पी  ऍग्रीमेंट झाले . त्यात कोणी काय काम करायचे , वाटा किती, तसेच एखाद्याला  पार्टनर म्हणून सामील करणे अथवा राजीनामा देणे ,कोणाचा मृत्यू झाल्यास काय ह्या सर्व आवश्यक बाबी व इतर सर्व आवश्यक असते त्यात नोंदल्या”.
सुदामा : “बर हे समजले पण कंपनी प्रमाणे ह्याच काम किचकट असते का ?”
धनंजय : “नाही नाही ही पार्टनर शिप आहे कंपनी नाही , पण कंपनी चे फायदे इथे लागू आहेत बरं , लिमिटेड लाएबीलिटी “
सुदामा :” हो मला सांगितले आहे श्रीहरी ने ह्या विषयी” .
धनंजय : “बर , पण काम सुरू केले की अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे . ती म्हणजे वार्षिक रिटर्न. जसे आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो तसेच अगदी काहीही धंदा झाला नसेल तरी एल एल पी चे वार्षिक रिटर्न म्हणजे
१.  वार्षिक रिटर्न
२. फायनान्स रिटर्न
जे अनुक्रमे मे महिन्यात आणि ऑक्टोबर महिना अखेरीस भरावे लागते.
व ते वेळेत न भरल्यास दंड वसूल केला जातो . आणि हो हे रिटर्न मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअरस् ह्याचाकडे भरायचे असते “.
सुदामा :” धन्यवाद तुम्ही खूप महत्वाची सूचना केलीत “.
धनंजय : “अहो खरं सूचना देणारा तर हा श्रीहरी आहे .”
श्रीहरी : “मी नावाप्रमाणे सूचना देणार , आपले कर्म आपल्यालाच करावं लागेल .”
धनंजय: “समजले हो पार्थ सारथी” 😄.
Visits: 674

लिमिटेड लाएबिलिटी पार्टनरशिप

 

श्रीहरी सुदामा संभाषण

श्रीहरी : ” नमस्कार मित्रा किती दिवसांनी भेटलास”

सुदामा :  “अरे हो सध्या एका वेगळ्या गोष्टीचा प्रयत्न करतोय”

श्रीहरी :  “काय कसला प्रयत्न ??”

सुदामा : ” अरे श्रीहरी स्वतःचा बिझनेस सुरु करिन म्हणतोय एक मित्र पण तयार आहे बरोबर काम करण्यासाठी पण एकदम कंपनी सुरु करणे जरा कठीण वाटते आहे “

श्रीहरी : ” अरे सुदामा बर झाले भेटलास , माझ्या एका मित्राने कंपनी सारखी एक पार्टनरशिप सुरु केली आहे . लिमिटेड लाएबिलिटी पार्टनरशिप अर्थात एलएलपी,   ती तुला कदाचित उपयुक्त ठरू शकते

सुदामा:  “पार्टनरशिप ऐकले आहे पण हे लिमिटेड लाएबिलिटी काय आहे !! “.

श्रीहरी : “सांगतो सांगतो , एलएलपी म्हणजे कंपनी आणि पार्टनरशिप यांचा जणू सुवर्णमध्य आहे.

  • नेहमीची पार्टनरशिप हि पार्टनरशिप ऍक्ट च्या नुसार रजिस्टर होते , एलएलपी हि एलएलपी ऍक्ट च्या नुसार मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कडे रजिस्टर होते.
  • नेहमीच्या पार्टनरशिप डीड प्रमाणे इथेही एलएलपी अग्रीमेंट करावे लागते.
  • नुसत्या पार्टनरशिप मध्ये पार्टनर्स ची लाएबिलिटी हि मर्यादित ( लिमिटेड ) नसते म्हणजे पार्टनरशिप ची काही देणी देताना पैसे कमी पडले तर पार्टनर्स ची पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा जप्त करून त्यातून देणी देतात .एलएलपी मध्ये पार्टनर्स ची लाएबिलिटी हि मर्यादित ( लिमिटेड ) असते ती त्यांनी केलेल्या काँट्रीब्युशन पुरती, त्यांची खाजगी संपत्ती येथे वापरता येत नाही .
  • तसेच कंपनी प्रमाणे एलएलपी ला स्वतंत्र अस्तित्व असते म्हणजे एलएलपी चे सुरुवातीचे पार्टनर्स चे निधन झाले किंवा त्यांनी पार्टनरशिप सोडली तरी दुसऱ्या पार्टनर्स बरोबर तीच पार्टनरशिप सुरु राहते . पण नेहमीच्या पार्टनरशिप मध्ये पहिल्या पार्टनर्स नंतर ती पार्टनरशिप तशीच सुरु ठेवता येत नाही .
  • जसे कंपनी मध्ये शेअर होल्डर्स बदलतात पण कंपनी तीच राहते तसेच एलएलपी चे पार्टनर्स बदलतात पण एलएलपी तीच राहते “

सुदामा: “श्रीहरी अरे खरोखर देवासारखा भेटलास मी आणि माझा मित्र दोघेही उद्याच येतो तुझ्याकडे एलएलपी बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी , तू माझे निम्मे टेन्शन हलके केलेस मित्रा ”    © CS धनश्री साठे

Visits: 416

वन पर्सन कंपनी (OPC)

नमस्कार
घरीच आहात ना ? घरी रहा सुरक्षित रहा . कोरोना विषयी खूप चर्चा सगळीकडे आहे . मी आज त्याविषयी बोलणार नाहीये .
तुम्हाला माहिती आहे का की फक्त एका माणसाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होऊ शकते??
आता तुम्ही म्हणाल की आधीच्या ब्लॉग मध्ये तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी साठी कमीत कमी दोन सभासद (शेअर होल्डर) लागतात  मग आता असं कसं ?
सांगते,
OPC  म्हणजे वन पर्सन कंपनी हा एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चा प्रकार आहे.
ह्याचे नाव लिहिताना
ABC ( OPC)  private limited
अश्या प्रकारे लिहिले जाते.
एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते , ज्यामध्ये फक्त एक माणूस शेअर होल्डर आणि तोच माणूस डायरेक्टर असतो . ही
प्रोप्राईटर फर्म नाही . ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे.
त्याचे वैशिष्ट्य पुढीप्रमाणे
१. ही एक माणसाची कंपनी आहे. पण कंपनी चे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे.
२. एकटाच शेअर होल्डर असून सुद्धा कंपनी व शेअर होल्डर व डायरेक्टर हे वेगळे असतात
३. एकच माणूस शेअर होल्डर व डायरेक्टर असतो . अजून डायरेक्टर्स घेता येतात पण ते शेअर होल्डर असत नाहीत.
४. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ची सर्व वैशिष्ठे येथे लागू होतात . म्हणजे कायद्याने निर्माण केलेला माणूस , स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, मालक व कंपनी स्वतंत्र अस्तित्व .
५. जेव्हा कंपनी चे टर्नओव्हर २ कोटी पार करते सलग तीन वर्षे तेव्हा ओपीसी ला अजून एक शेअर होल्डर घेऊन  नेहमीच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये रुपांतर करावे लागते .
६. स्वतः रुपांतरित होण्यासाठी कंपनी ला २ वर्ष पूर्ण झालेली पाहिजेत .
७. लिमिटेड लाएबलिटी जी नेहमीच्या  कंपनी ला असते तशीच ती ओ पी सी ला पण असते.
छोट्या व्यावसायिकांसाठी ही एक उपयुक्त व्यवसाय पद्धत आहे.
Visits: 311

पब्लिक कंपनी

 नमस्कार
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !!!!
आजचा ब्लॉग सुरु करण्याआधी मी माझा सखा सहाचारी माझ्या नवऱ्याचे विशेष कौतुक करते कारण फक्त विमेंस डे पुरते मदत व कौतुक न करता कायमच माझ्या मदतीसाठी धावून येण्यासाठी. तसेच माझे दोन्ही वडील म्हणजे  माझे  दिवंगत जन्मदाते वडील व माझे सासरे ह्या दोघांचेही विशेष म्हणजे दोघेही माझ्या प्रगती साठी सतत प्रयत्न करत होते . वडील कायम भक्कम आधार म्हणून उभे राहिले आणि स्त्री म्हणून माझ्यावर कधीही अवास्तव बंधने लादली नाहीत उलट जास्त सक्षम बनवले.
आजचा ब्लॉग ह्या तिघांना समर्पित. सर्व स्त्रियांना असे शुभचिंतक लाभो हीच प्रार्थना !!!
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय ते आपण मागील लेखात पहिले. आज पब्लिक कंपनी विषयी माहिती घेऊ.
पब्लिक कंपनीची मालकी सार्वजनिक असते . कंपनी आपले शेअर सर्वांसाठी विक्री साठी खुले ठेवते.
पब्लिक कंपनीचे  2 प्रकार आहेत.
१) लिस्टेड पब्लिक कंपनी
२) अन लिस्टेड पब्लिक कंपनी
१) लिस्टेड  पब्लिक कंपनी म्हणजे ज्या कंपनी चे शेअर्स शेअर बाजारात नोंदणी केलेले आहेत व जे पब्लिक ना सार्वजनिक रित्या खरेदी व विक्री साठी उपलब्ध आहेत .
२) अन लिस्टेड पब्लिक कंपनी म्हणजे अशी कंपनी जीचे शेअर बाजारात नोंदणी केलेले नाहीत पण कंपनी चे शेअर्स सार्वजनिक रित्या खरेदी विक्री करता येते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखे ह्या कंपनी वर सार्वजनिक रित्या शेअर व्यवहार बंधन नाही.
प्रायव्हेट लिमिटेड प्रमाणेच शेअर होल्डर ची लाईबलिटी मर्यादित असते ती त्यांनी घेतलेल्या शेअर्स पुरती.
अधिक माहिती:
१. पब्लिक कंपनी चे स्वतंत्र कायम अस्तित्व असते जोपर्यंत ती कायद्याने बंद केली जात नाही अथवा बंद होत नाही.
२. कंपनी चे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. वेगळा नोंदणी क्रमांक नाव व पत्ता असतो .
३. पब्लिक कंपनी मध्ये कमीत कमी ७ सभासद ( शेअर होल्डर) व जास्तीत जास्त कितीही असू शकतात.
४. कंपनी ला स्वतःचे शरीर नसते त्यामुळे डायरेक्टर कंपनी वतीने कंपनी चे संमती ने व्यवहार करतो.
५. लिस्टेड कंपनी ला स्टॉक एक्सचेंज चे काही नियम पाळावे लागतात . काही जाहीर निवेदने द्यावी लागतात जेणे करून कंपनी  चे व्यवहार  पारदर्शक असण्याची खात्री पटते.
६. लिस्टेड कंपनी वर बरीच बंधने असतात कारण ती भागधारकांना  उत्तरे देण्यास बांधील असते. त्यामुळे डायरेक्टर चे काम चोख असणे गरजेचे असते.
७ . प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नंतर पब्लिक कंपनी मध्ये रुपांतर करता येते. तसेच पब्लिक कंपनी प्रायव्हेट कंपनी मध्ये रुपांतर होऊ शकते .
आज इतकेच धन्यवाद !!!!
Visits: 460

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी

नमस्कार ,
ह्या आधीच्या लेखात आपण कंपनी म्हणजे काय व त्याचे किती प्रकार असतात ते पहिले ,आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय ह्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
कंपनी म्हणजे कायद्याने निर्माण केलेला एक माणूस हे आपण पाहिले.
आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे जी कंपनी खाजगी मालकीची आहे व ज्या कंपनी ला आपले शेअर शेअर बाजारात अथवा सार्वजनिक रित्या विकता येत नाहीत.
लिमिटेड कंपनी मध्ये लिमिटेड काय आहे तर शेअर होल्डर ची लाएबलिटी ही त्यांनी धारण केलेल्या शेअर्स पुरती मर्यादित असते . म्हणजे कंपनी ची देणी देताना शेअर होल्डर नी धारण केलेल्या शेअर्स पुरती त्याची लाएबलिटी ,(देयता) असते.
आधिक वैशिष्टय
१. कंपनी चे अस्तित्व कायम असते जो पर्यंत ती कायद्याने बंद केली जात नाही व बंद होत नाही.
२. सर्व शेअर होल्डर जरी बदलले अथवा मृत झाले तरी नवीन शेअर होल्डर कंपनी पुढे चालवू शकतात .
३. कंपनी चे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे . वेगळे नाव , पत्ता आहे .तसेच वेगळा नोंदणी क्रमांक आहे.
४. कमीत कमी २ व जास्तीत जास्त २०० एवढे भागधारक / शेअर होल्डर  प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये असतात.
५. कमीत कमी २ व जास्तीत जास्त १५ डायरेक्टर असतात.
६. कंपनी ला स्वतःचे शरीर नसते म्हणून कंपनी त्याचा डायरेक्टर च्या मदतीने काम करते.
७. कंपनी स्वतःच्या वतीने काम करण्यासाठी व विविध निर्णय घेण्यासाठी डायरेक्टर ला संमती देते.
Visits: 566

कंपनीचे प्रकार

नमस्कार,
जागतिक नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकानी नवीन वर्षात काही नवीन गोष्टी करायचे ठरवले असेल . मी पण नवीन वर्षात जेवढे काही नवीन सांगता येईल , चांगल्या गोष्टी कशा आत्मसात करता येईल ते पहायचे ठरवले आहे.
डिसेंबर महिन्यात आपण कंपनी व प्रमोटर विषयी माहिती पाहिली
आज कंपनी च्या विविध प्रकारांची माहिती जाणून घेऊ.
सर्वांना ढोबळ मानाने माहिती असणारे प्रकार म्हणजे
१. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
२. पब्लिक कंपनी
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे ज्या कंपनी मधे शेअर  होल्डर ( भागधारक) ची संख्या कमीत कमी २ व जास्तीत जास्त २०० असते. तसेच या कंपनी ला शेअर्स जाहीररीत्या सार्वजनिक रित्या  विकता येत नाहीत
पब्लिक कंपनी मध्ये कमीत कमी ७ शेअर होल्डर ( भागधारक)असतात ,कमाल मर्यादा नाही .पब्लिक कंपनी आपले शेअर शेअर्स बाजारात व सार्वजनिक रित्या विकू शकते.
कंपन्या खालील प्रकारच्या असतात
१. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
२. वन परसन कंपनी ( प्रायव्हेट कंपनी चा एक प्रकार)
३. पब्लिक कंपनी
  •    लिस्टेड पब्लिक कंपनी
  •   अनलिस्टेड पब्लिक कंपनी
४. सेक्शन ८ , सामाजिक सुधारणा कार्य करणारी , चारिटी
५. फार्मर्स प्रोडूसर कंपनी
६. निधी कंपनी
ह्या व्यतिरिक्त पण कंपनी व पार्टनर शिप ( भागीदारी) ह्यांचे चांगले गुणधर्म एकत्र केलेली एलएल पी  म्हणजे लिमिटेड लाएबलीटी पार्टनर शिप  हा पण एक कंपनी सारखाच प्रकार आहे.
पुढील भागात आपण ह्या प्रत्येक कंपनी ची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
तुम्ही केलेले सर्व संकल्प पूर्ण होवोत . जो जे वांछील तो ते लाभो
Visits: 358
error: Content is protected !!
WhatsApp chat