POSH वर्षअखेरची कायदेशीर पूर्तता आणि आवश्यकता

 

रमेश : “ सुप्रभात सूरज “

सूरज : “ सुप्रभात रमेश ,काय कशी झाली दिवाळी ? ही दिवाळी फारच चांगली गेली ह्या कोविड प्रकरण नंतर”

रमेश : “ हो ही दिवाळी खरंच छान आणि वेगळी होती , मी ह्या वेळी माझ्या कुटुंबाबरोबर वेळ व्यतीत केला आणि माझ्या आणखीन मोठ्या कामाच्या ठिकाणच्या कुटुंबाबरोबर एक खास प्रकारे आम्ही दिवाळी साजरी केली. आम्ही एक ट्रेनिंग ठेवले होते. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ विरोधी कायद्या POSH संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांसाठी ठेवले होते ट्रेनिंग.”

सूरज : “ लैंगिक छळ कामाच्या ठिकाणी , POSH हे काय ?

रमेश :” कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ विरोधी कायदा POSH हा सरकारने आणला आहे . POSH चा अर्थ Prevention of Sexual Harassment at workplace असा आहे. ह्या कायद्या नुसार कामाच्या ठिकाणी असणाऱ्या स्त्री कर्मचऱ्यांची सुरक्षा ही मालकाची जबाबदारी आहे . त्याने  ह्या कायद्या अंतर्गत येणाऱ्या सर्वे आवश्यक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे, जसे की ,

१. तुमच्या कडे १० अथवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर एक अंतर्गत समिति स्थापन करणे गरजेचे आहे .

२. तुमच्या कर्मचाऱ्याना ह्या कायद्या विषयी माहीत करून देण्यासाठी ट्रेनिंग , प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे.

३. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या कायद्यातील सर्व आवश्यक बाबी ची पूर्तता डिसेंबर अखेर पूर्ण करणे व त्याचा अहवाल ( रीपोर्ट) जानेवारी अखेर पर्यन्त देणे बंधनकारक आहे .

सूरज : “ पण मला पण हे करावे लागेल का ?”

रमेश : “ जर तुझ्याकडे १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर तुझ्या कडे POSH अंतर्गत समिति स्थापन करणे गरजेचे आहे . तसेच ती समिति आहे याचा रीपोर्ट अहवाल सरकारला देणे गरजेचे आहे नाहीतर तुला ५०,०००/- पर्यन्त दंड होऊ शकतो आणि जर तु काही न करता दुर्लक्ष केलेस तर तुझे बिझनेस लायसेंस पण कॅन्सल केले जाऊ शकते . त्यामुळे ह्या कडे दुर्लक्ष करू नको .”

सूरज : “ अरे बापरे माझ्याकडे १५ आहेत , म्हणजे मला सर्व करावे लागेल , मला सांग हे कोण सांगेल आणि करून देईल?”

रमेश : “ नको काळजी करू माझ्या माहितीचे एक सल्लागार आहेत त्यांचा कॉनटॅक्ट देतो.”

Visits: 3850

POSH कोणासाठी ??

“चला मला बरी आठवण झाली येतो आता”  दुकान मालक( रमेश ) मित्राला  : “आता फक्त सहा महिने राहिले POSH ( Prevention Of Sextual Harassment at Workplace) चे Compliances करण्यासाठी , training आणि Annual Report साठी तयारी केली पाहिजे “
दिनेश: ” POSH हे काय आहे अरे आपला तर छोटासा बिझनेस आहे , दुकान आहे आणि छोटे ऑफिस आहे आपल्याला कुठे ते कंपनी सारखे Annual Report वगैरे??
रमेश: ” अरे मित्रा तुझ्याकडे 10 किंवा त्यापेक्षा जास्त लोक काम करत असतील भले ते रोजंदारीवर असतील किंवा कायम असतील POSH Act तुला लागू होतो आणि जर तू त्या कायद्याअंतर्गत येणारे compliances केले नाहीस तर प्रथम दंड ₹.50000/- आहे .  तरीसुद्धा Compliance करत नाही राहिलात किंवा दुर्लक्ष केले तर बिझनेस लायसेन्स रद्द होऊ शकते . प्रत्येक वर्षी ह्याचा compliance करणे गरजेचे आहे. “
” हा कायदा महिलांच्या संरक्षणासाठी केलेला आहे . त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित असल्याची खात्री होईल व बिझनेस चा मालक त्यांचे सुरक्षे साठी जबाबदार राहील.”
दिनेश: ” अरे मग तर काहीच काळजी नाही माझ्याकडे एकही स्त्री कामाला नाही. “
रमेश : ” अरे मित्रा तसे नाही तुझ्याकडे स्त्री कर्मचारी नसेल पण बाहेरून काही कामा निमित्ताने येत असतील की , त्यांना पण ह्या कायद्याने संरक्षण आहे.”
दिनेश : ” अरे देवा मला ह्या कायद्याविषयी जाणून घेऊन योग्य ते विवरण भरले पाहिजे . मला कोण सल्ला देऊ शकेल ?
रमेश : ” आहेत माझ्या माहितीचे POSH सल्लागार त्यांच्याशी भेट करून देतो “
दिनेश: ” धन्यवाद मित्रा “

 

Visits: 2071

POSH हा कायदा कोणाला लागू आहे ?

नमस्कार,

गेल्या ब्लॉग मध्ये आपण POSH , म्हणजे स्त्रियांचे लैंगिक शोषण विरोधी कायद्या विषयाशी पूर्वपीठिका पाहिली, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळ व लैंगिक शोषण थांबवणे, व अन्याय झाला असल्यास त्याचे निराकरण करणे व दोषी व्यक्तीला योग्य ती शिक्षा करणे ह्या विषयी च्या तरतुदी ह्या कायद्यात आहेत.

हा कायदा कोणाला लागू आहे ?

कोणतेही डिपार्टमेंट , ऑफिस , शाखा , एसटॅबलिशमेन्ट, संस्था ,यूनिट ,अन्डरटेकिंग की जे पूर्णतः अथवा    अंशतः सरकारी ,निमसरकारी , अनुदानित विनाअनुदानित , स्थानिक पदधिकारी , सरकारी कंपनी , कार्पोरेशन , कोणतीही खाजगी कंपनी , पब्लिक कंपनी , ट्रस्ट , सोसायटी, एनजीओ ,की जिथे व्यावसाईक , प्रोफेशनल ,वोकींशनल, शैक्षणिक , आरोग्य , वित्तविषयक ,इंडस्ट्री इत्यादि ह्याच्या मार्फत , निर्मिती, सेवा , वितरण ,व वितरण सेवा दिली जाते असे कोणतेही ( workplace) अर्थात कामाची जागा,  इस्पितळ , नर्सिंग होम , खेळाची संस्था , स्टेडियम, कॉम्प्लेक्स , स्पर्धा केंद्र,जिथे रहिवास व प्रशिक्षण यांची सोय आहे ,मालकानि पूरवलेले जाण्या येण्याची सुविधा , कोणतेही जागा जिथे , कर्मचारी त्याच्या संस्था , कंपनी इत्यादि  च्या कामासाठी जाईल त्या सर्व जागा म्हणजे त्यात आपले घर सुद्धा आले बर का !! कारण आपल्या कडे कामाला येणाऱ्या मावशी सुद्धा ह्यामध्ये संरक्षण मिळवण्यास पात्र आहेत .

थोडक्यात काय तर सर्व कामाच्या ठिकाणी हा कायदा लागू आहे. कामाच्या ठिकाणी जरी कोणी महिला कर्मचारी नसेल तरी सुद्धा हा कायदा लागू आहे . त्यामुळे जेथे महिला कर्मचारी नाहीत त्यांना काही करायची गरज नाही हा गैरसमज आहे.

हा कायदा मालकावर ( Employer ) ही जबाबदारी देतो आहे की त्याच्या कामाच्या जागी येणाऱ्या प्रत्येक महिलेची संरक्षणाची जबाबदारी ही त्याची आहे , ती महिला त्याची कर्मचारी असो अथवा नसो. त्यामुळे प्रत्येक उद्योग व्यवसाय मालक तसेच सरकारी , निमसरकारी ऑफिस मधील अधिकारी हे ह्या कायद्या अंतर्गत जबाबदार धरले जातात.

पुढील ब्लॉग मध्ये ह्या कायद्यातील अजून काही महत्वपूर्ण तरतुदी पाहणार आहोत .

Visits: 579

लैंगिक शोषणाच्या विरोधात कायदा (प्रिवेंशन ऑफ सॅक्शुअल हॅरास्मेंट कायदा)

नमस्कार ,
नुकताच गणेश उत्सव व गौरी पूजन यथासांग पार पडले. ह्या वर्षी विसर्जन मिरवणूक नाही झाली त्यामुळे फार चुकल्या चुकल्यासारखं वाटलं.
गौरी पूजन च्या दिवशी सर्व काही छान झाले. तेव्हा विचार आला की का आपण देवी पूजन करतो?
आपल्या वेदामध्ये सुद्धा एक श्लोक आहे .
“यत्र नार्यस्तू पुजन्ते रमंते तत्र देवता”
म्हणजे जेथे स्त्रीला चांगली वागणूक दिली जाते तिला पुजले जाते तेथे प्रत्यक्ष देवता वास करते,परंतु आपल्या समाजात वावरताना आपण खरंच हे अनुभवतो का? नाही स्त्री ला सगळीकडे चांगली वागणूक मिळेल असे दिसत नाही .
स्त्री कडे पाहण्याची वृत्ती बदलणे आवश्यक आहे.स्त्री आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे . त्यासाठी ती नोकरी /व्यवसाय करू लागली आहे . परंतु कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणापासून अजून तिची सुटका झालेली नाही .त्यासाठी पुरुष सहकार्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
सरकारने POSH अर्थात प्रिवेंशन ऑफ सॅक्शुअल हॅरास्मेंट म्हणजे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विरोधात कायदा संमत केला आहे.
हा कायदा काय सांगतो ते आपण जाणून घेऊ.
स्त्री व पुरुष दोघांनीही हा जाणून घेणे गरजेचे आहे.
ह्या कायद्याची थोडी पूर्वपीठिका समजून घेऊ . भवरी देवी नावाची एक महिला राजस्थान मधे सरकारी योजने मधे प्रबोधनाचे काम करत होती. तिने एक बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केला पण त्या बदल्यात तिचे गावकरी व गावातील जमीनदार मालक व इतर ह्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्या विरोधात तक्रार दाखल झाली पण निकाल विरोधात गेला त्यानंतर एका ” विशाखा” नामक स्वयंसेवी संस्थेने आदरणीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली व आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने विशाखा मार्गदर्शक तत्वे जाहीर केली ( वर्ष 1997) व सर्व व्यवसाय मालक व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांचे अधिकारी यांच्यावर ती पालन करण्याचे बंधन घातले .
पुढे हीच तत्वे The Sexual Harassment at workplace( Prevention , Prohibition and Redressal ) Act , 2013 ( POSH) ह्या कायद्याच्या रूपाने समोर आली.जेणेकरून कोणत्याही महिलेला तिच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवता येईल किंबहुना ते थांबवता येईल .
Visits: 344

उत्पादक कंपनी / प्रोड्युसर कंपनी गरज

उत्पादक कंपनी / प्रोड्युसर कंपनी का आवश्यक आहे ?

आता शेती म्हणजे नुकसान असा गैरसमज झाला आहे . तरुण वर्ग नोकरी व शहर याकड़े आकर्षित झाला आहे.अन्नदाता शेतकरी शेती पासून दूर झाला तर भविष्य अधांतरी आहे

आता एकट्याने शेती करणे परवडणारे नाही त्यामुळे शेतकरी संघटीत होणे गरजेचे आहे. त्याला कायद्याचे संरक्षण व बळ सरकार ने फार्मर प्रोड्यूसर कंपनी (FPC) च्या रूपाने उपलब्ध करून दिले आहे.

उत्पादक कंपनी काय काय करू शकते

कृषी , बागकाम , हँडीक्राफ्ट, वन उत्पादन, बाय-प्रोडक्ट, सहायक प्रक्रिया उद्योग , फूलशेती, पशुसंवर्धन , वनीकरण ,मधमाशी पालन कराणारे, कॉटेज उद्योग, डेअरी, फूड प्रोसेस , रेशीम उद्योग उत्पादन, प्रोक्यूरमेन्ट,हार्वेस्टिंग सीडींग,पूलींग,हाताळणी,  विपणन,मार्केटिंग,विक्री,निर्यात आयात,करू शकता. कंपनी ह्या सर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरील एखाद्या संस्थेकडून करून घेऊ शकतात , ऑरगॅनिक फार्मिंग ,पोल्ट्री फार्मिंग, फिश प्रोजेक्ट, आयुर्वेदिक मेडिसीन प्लांट, कोल्ड स्टोर,  शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, सहायक प्रक्रिया उद्योग , ऍग्रो टूरिझम, रिन्यूएबल एनरजी. जवळपास सत्तर प्रकार कृषी आणि संबंधित व्यवसाय ते करू शकतात.

उत्पादक कंपनी / प्रोड्युसर कंपनी चे उद्देश, कंपनी चे फायदे  :

१. सभासदानी घेतलेल्या उत्पादनाचे उत्पादन केलेल्या किंवा कंपनीने त्यासाठी आयात केलेल्या अशा , हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, पुलिंग, हातळणी, विपणन, विक्री आणि निर्यात करु शकतात. तसेच कंपनी ह्या सर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरिल एखाद्या संस्थेकडुन करुन घेवु शकतात. कृषि उपकरणे, बियाणे, लाइव्ह स्टॉक किंवा शेतीसाठी इतर वस्तू सदस्यांना पुरवठा करणे हे काम उत्पादक कंपनी  करते .

२. सभासदांनी बनवलेल्या उत्पादनाचे प्रोसससिंग ,प्रेझरविंग, ड्रायिंग,डीस्टीलिंग, कॅनिंग पॅकिंग

३. सभासदान साठी यंत्र उत्पादन विक्री ,सेवा , तंत्रज्ञान

४.प्रशिक्षण ,सभासदांनी एकमेक साहाय्य करणे

५. सभासदांचा उपयोगासाठी तांत्रिक मदत ,कौशल्य प्रशिक्षण ,शोध व डेव्हलोपमेंट

६. ऊर्जा निर्मिती वहन व वितरण , जमीन व पाणी यांचे सौवर्धन , संगोपन व प्राथमिक उत्पादन वाढ

७.प्राथमिक उत्पादनाचे इन्शुरन्स विमा शेती विमा , पीक विमा

८. नवीन तंत्रज्ञान विकास व परस्पर साहाय्य

९.सभासदांचा हितासाठी आवश्यक सोयी व साहाय्य करणे

१०.आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे

११. नाबार्डच्या विशेष योजनेच्या व्यतिरिक्त देखील अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळू शकतो.

१२. शहर व गाव या कंपनी मुळे जोडले जाऊ शकते. शहरातील आपलेच भाउबंध ग्राहक थेट या कंपनी द्वारे शेतकरी वर्गाशी जोडला जाईल त्याचा फायदा दोघांनाही होईल एक शेतकरी उत्पादक कंपनी म्हणुन या कंपनीस सहानुभुती आणि दर्जाची खात्री असल्याचा नैसर्गिक फायदा मिळेल.

१३. बाजारपेठेत कंपनी ची उत्पादने कंपनीच्या नावे ब्रँड ने थेट विक्री करुन मध्यस्थाना न देता वाटाघाटी करुन चांगला नफा मिळवता येईल. सर्व मार्केटिंग, जाहीराती ट्रेडमार्क ब्रँड तयार करता येईल. या विक्रीतुन येणारा नफा पुन्हा शेतकरी वाटुन घेतील

१४. गावातच रोजगार निर्माण होईल. नैसर्गिक आपत्तीपासुन येणारे संकट कमी होईल, कारण जरी सभासद सदस्यांकडे काही पिकले नाही तरी बाहेरुन आणुन त्यावर प्रक्रिया करुन उद्योग आणि रोजगार सुरु राहील.

१५. बी बियाणे  खते सर्व मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याची सभासदांना माफक दराने उपलब्ध करून देता येतात .नवीन तंत्रज्ञान , प्रशिक्षण ,पाण्याचा योग्य वापर करून शेती उत्पन्न वाढवता येईल.

 

Visits: 425

उत्पादक कंपनी / निर्माता कंपनी (शेतकरी कंपनी) संकल्पना आणि महत्त्वपूर्ण तरतुदी

छोट्या गटांना एकत्र करुन त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी तसेच कायद्याचे संरक्षण देण्यासाठी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चा पर्याय उपलब्ध आहे.
कंपनी ऍक्ट १९५६ / २०१३ नुसार
·       सभासद / शेअर होल्डर :
 कमीत कमी 10 वैयक्तिक (शेतकरी)किंवा 2 किंवा अधिक उत्पादक संस्था (प्राथमिक उत्पादन करणारी उत्पादक संस्था किंवा शेतकरी.) (प्राथमिक उत्पादन : कृषी ,बागकाम, हँडीक्राफ्ट, वनउत्पादन, बाय-प्रोडक्ट, सहायक प्रक्रिया करणारे वगैरे) एकत्र येऊन एक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन करू शकतात  ती शेतकऱ्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते . शेतकरी, कंपनीचे शेअर होल्डर असतील(७/१२ चा उतारा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून)
·       *उत्पादक कंपनीचे फायदे:*
§  उत्पादक कंपनी चा उद्देश शेतक-यांना सामूहिक स्वरुपात संघटित करणे आहे.
§  बी बियाणे खते सर्व मोठ्या प्रमाणात खरेदी करून सभासदांना माफक दराने उपलब्ध करून देता    येतात. उत्पादनाची साठवण, शेती उत्पादनाची प्रक्रिया करणे. कृषि उपकरणे, लाइव्ह स्टॉक किंवा शेतीसाठी इतर वस्तू सदस्यांना पुरवठा
§  नवीन तंत्रज्ञान , प्रशिक्षण ,पाण्याचा योग्य वापर करून शेती उत्पन्न वाढवता येईल
§  शेतकऱ्यांना जमा भांडवलाचा ४० टक्के व्हेंचर कॅपिटल बिन व्याजी मिळू शकते
§  सभासद संख्या वाढविण्यासाठी १ लाख रुपयाची रक्कम बँकेमार्फत उपलब्ध करून दिली   जाईल.
§  बाजारपेठेत कंपनी ची उत्पादने कंपनीच्या नावे   ब्रँड ने थेट विक्री करुन मध्यस्थाना न देता वाटाघाटी करुन चांगला नफा मिळवता येईल
§  उत्पादक कंपनीला सरकारकडून सहज कर्ज (नाबार्ड द्वारा) उपलब्ध आहे. 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते .
§  कंपनी फूड प्रोसेस चे काम करू शकते , सोलर पॉवर प्लांट इन्स्टॉल करता येतो , रेशीम उद्योग , बी फार्मिंग , पॉलीहाऊस , पशुपालन , डेअरी  ह्या सारखे उद्योग शेतीच्या जोडी ने करता येतात .
·       *उदाहरणासाठी*
१. सहयाद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ,नाशिक १५०० मेंबर्स आणि ७०० कंटेनर एक्स्पोर्ट
२. वॅनिला इंडिया प्रोड्युसर कंपनी ,केरळ . वॅनिला एक्स्पोर्ट ४ कोटी प्रति वर्ष
३. भानगर प्रोड्युसर कंपनी,  कोलकाता .मदर डेअरी ला पुरवठा करतात ,१७५० मेंबर्स
Visits: 270
error: Content is protected !!
WhatsApp chat