“चला मला बरी आठवण झाली येतो आता” दुकान मालक( रमेश ) मित्राला : “आता फक्त सहा महिने राहिले POSH ( Prevention Of Sextual Harassment at Workplace) चे Compliances करण्यासाठी , training आणि Annual Report साठी तयारी केली पाहिजे “
दिनेश: ” POSH हे काय आहे अरे आपला तर छोटासा बिझनेस आहे , दुकान आहे आणि छोटे ऑफिस आहे आपल्याला कुठे ते कंपनी सारखे Annual Report वगैरे??
रमेश: ” अरे मित्रा तुझ्याकडे 10 किंवा त्यापेक्षा जास्त लोक काम करत असतील भले ते रोजंदारीवर असतील किंवा कायम असतील POSH Act तुला लागू होतो आणि जर तू त्या कायद्याअंतर्गत येणारे compliances केले नाहीस तर प्रथम दंड ₹.50000/- आहे . तरीसुद्धा Compliance करत नाही राहिलात किंवा दुर्लक्ष केले तर बिझनेस लायसेन्स रद्द होऊ शकते . प्रत्येक वर्षी ह्याचा compliance करणे गरजेचे आहे. “
” हा कायदा महिलांच्या संरक्षणासाठी केलेला आहे . त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित असल्याची खात्री होईल व बिझनेस चा मालक त्यांचे सुरक्षे साठी जबाबदार राहील.”
दिनेश: ” अरे मग तर काहीच काळजी नाही माझ्याकडे एकही स्त्री कामाला नाही. “
रमेश : ” अरे मित्रा तसे नाही तुझ्याकडे स्त्री कर्मचारी नसेल पण बाहेरून काही कामा निमित्ताने येत असतील की , त्यांना पण ह्या कायद्याने संरक्षण आहे.”
दिनेश : ” अरे देवा मला ह्या कायद्याविषयी जाणून घेऊन योग्य ते विवरण भरले पाहिजे . मला कोण सल्ला देऊ शकेल ?
रमेश : ” आहेत माझ्या माहितीचे POSH सल्लागार त्यांच्याशी भेट करून देतो “
दिनेश: ” धन्यवाद मित्रा “
Visits: 2138