नमस्कार ,
नुकताच गणेश उत्सव व गौरी पूजन यथासांग पार पडले. ह्या वर्षी विसर्जन मिरवणूक नाही झाली त्यामुळे फार चुकल्या चुकल्यासारखं वाटलं.
गौरी पूजन च्या दिवशी सर्व काही छान झाले. तेव्हा विचार आला की का आपण देवी पूजन करतो?
आपल्या वेदामध्ये सुद्धा एक श्लोक आहे .
“यत्र नार्यस्तू पुजन्ते रमंते तत्र देवता”
म्हणजे जेथे स्त्रीला चांगली वागणूक दिली जाते तिला पुजले जाते तेथे प्रत्यक्ष देवता वास करते,परंतु आपल्या समाजात वावरताना आपण खरंच हे अनुभवतो का? नाही स्त्री ला सगळीकडे चांगली वागणूक मिळेल असे दिसत नाही .
स्त्री कडे पाहण्याची वृत्ती बदलणे आवश्यक आहे.स्त्री आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे . त्यासाठी ती नोकरी /व्यवसाय करू लागली आहे . परंतु कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणापासून अजून तिची सुटका झालेली नाही .त्यासाठी पुरुष सहकार्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
सरकारने POSH अर्थात प्रिवेंशन ऑफ सॅक्शुअल हॅरास्मेंट म्हणजे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विरोधात कायदा संमत केला आहे.
हा कायदा काय सांगतो ते आपण जाणून घेऊ.
स्त्री व पुरुष दोघांनीही हा जाणून घेणे गरजेचे आहे.
ह्या कायद्याची थोडी पूर्वपीठिका समजून घेऊ . भवरी देवी नावाची एक महिला राजस्थान मधे सरकारी योजने मधे प्रबोधनाचे काम करत होती. तिने एक बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केला पण त्या बदल्यात तिचे गावकरी व गावातील जमीनदार मालक व इतर ह्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्या विरोधात तक्रार दाखल झाली पण निकाल विरोधात गेला त्यानंतर एका ” विशाखा” नामक स्वयंसेवी संस्थेने आदरणीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली व आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने विशाखा मार्गदर्शक तत्वे जाहीर केली ( वर्ष 1997) व सर्व व्यवसाय मालक व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांचे अधिकारी यांच्यावर ती पालन करण्याचे बंधन घातले .
पुढे हीच तत्वे The Sexual Harassment at workplace( Prevention , Prohibition and Redressal ) Act , 2013 ( POSH) ह्या कायद्याच्या रूपाने समोर आली.जेणेकरून कोणत्याही महिलेला तिच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवता येईल किंबहुना ते थांबवता येईल .
Visits: 414
error: Content is protected !!
WhatsApp chat