श्रीहरी सुदामा संभाषण
श्रीहरी : ” नमस्कार मित्रा किती दिवसांनी भेटलास”
सुदामा : “अरे हो सध्या एका वेगळ्या गोष्टीचा प्रयत्न करतोय”
श्रीहरी : “काय कसला प्रयत्न ??”
सुदामा : ” अरे श्रीहरी स्वतःचा बिझनेस सुरु करिन म्हणतोय एक मित्र पण तयार आहे बरोबर काम करण्यासाठी पण एकदम कंपनी सुरु करणे जरा कठीण वाटते आहे “
श्रीहरी : ” अरे सुदामा बर झाले भेटलास , माझ्या एका मित्राने कंपनी सारखी एक पार्टनरशिप सुरु केली आहे . लिमिटेड लाएबिलिटी पार्टनरशिप अर्थात एलएलपी, ती तुला कदाचित उपयुक्त ठरू शकते“
सुदामा: “पार्टनरशिप ऐकले आहे पण हे लिमिटेड लाएबिलिटी काय आहे !! “.
श्रीहरी : “सांगतो सांगतो , एलएलपी म्हणजे कंपनी आणि पार्टनरशिप यांचा जणू सुवर्णमध्य आहे.
- नेहमीची पार्टनरशिप हि पार्टनरशिप ऍक्ट च्या नुसार रजिस्टर होते , एलएलपी हि एलएलपी ऍक्ट च्या नुसार मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कडे रजिस्टर होते.
- नेहमीच्या पार्टनरशिप डीड प्रमाणे इथेही एलएलपी अग्रीमेंट करावे लागते.
- नुसत्या पार्टनरशिप मध्ये पार्टनर्स ची लाएबिलिटी हि मर्यादित ( लिमिटेड ) नसते म्हणजे पार्टनरशिप ची काही देणी देताना पैसे कमी पडले तर पार्टनर्स ची पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा जप्त करून त्यातून देणी देतात .एलएलपी मध्ये पार्टनर्स ची लाएबिलिटी हि मर्यादित ( लिमिटेड ) असते ती त्यांनी केलेल्या काँट्रीब्युशन पुरती, त्यांची खाजगी संपत्ती येथे वापरता येत नाही .
- तसेच कंपनी प्रमाणे एलएलपी ला स्वतंत्र अस्तित्व असते म्हणजे एलएलपी चे सुरुवातीचे पार्टनर्स चे निधन झाले किंवा त्यांनी पार्टनरशिप सोडली तरी दुसऱ्या पार्टनर्स बरोबर तीच पार्टनरशिप सुरु राहते . पण नेहमीच्या पार्टनरशिप मध्ये पहिल्या पार्टनर्स नंतर ती पार्टनरशिप तशीच सुरु ठेवता येत नाही .
- जसे कंपनी मध्ये शेअर होल्डर्स बदलतात पण कंपनी तीच राहते तसेच एलएलपी चे पार्टनर्स बदलतात पण एलएलपी तीच राहते “
सुदामा: “श्रीहरी अरे खरोखर देवासारखा भेटलास मी आणि माझा मित्र दोघेही उद्याच येतो तुझ्याकडे एलएलपी बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी , तू माझे निम्मे टेन्शन हलके केलेस मित्रा ” © CS धनश्री साठे