नमस्कार
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !!!!
आजचा ब्लॉग सुरु करण्याआधी मी माझा सखा सहाचारी माझ्या नवऱ्याचे विशेष कौतुक करते कारण फक्त विमेंस डे पुरते मदत व कौतुक न करता कायमच माझ्या मदतीसाठी धावून येण्यासाठी. तसेच माझे दोन्ही वडील म्हणजे  माझे  दिवंगत जन्मदाते वडील व माझे सासरे ह्या दोघांचेही विशेष म्हणजे दोघेही माझ्या प्रगती साठी सतत प्रयत्न करत होते . वडील कायम भक्कम आधार म्हणून उभे राहिले आणि स्त्री म्हणून माझ्यावर कधीही अवास्तव बंधने लादली नाहीत उलट जास्त सक्षम बनवले.
आजचा ब्लॉग ह्या तिघांना समर्पित. सर्व स्त्रियांना असे शुभचिंतक लाभो हीच प्रार्थना !!!
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय ते आपण मागील लेखात पहिले. आज पब्लिक कंपनी विषयी माहिती घेऊ.
पब्लिक कंपनीची मालकी सार्वजनिक असते . कंपनी आपले शेअर सर्वांसाठी विक्री साठी खुले ठेवते.
पब्लिक कंपनीचे  2 प्रकार आहेत.
१) लिस्टेड पब्लिक कंपनी
२) अन लिस्टेड पब्लिक कंपनी
१) लिस्टेड  पब्लिक कंपनी म्हणजे ज्या कंपनी चे शेअर्स शेअर बाजारात नोंदणी केलेले आहेत व जे पब्लिक ना सार्वजनिक रित्या खरेदी व विक्री साठी उपलब्ध आहेत .
२) अन लिस्टेड पब्लिक कंपनी म्हणजे अशी कंपनी जीचे शेअर बाजारात नोंदणी केलेले नाहीत पण कंपनी चे शेअर्स सार्वजनिक रित्या खरेदी विक्री करता येते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखे ह्या कंपनी वर सार्वजनिक रित्या शेअर व्यवहार बंधन नाही.
प्रायव्हेट लिमिटेड प्रमाणेच शेअर होल्डर ची लाईबलिटी मर्यादित असते ती त्यांनी घेतलेल्या शेअर्स पुरती.
अधिक माहिती:
१. पब्लिक कंपनी चे स्वतंत्र कायम अस्तित्व असते जोपर्यंत ती कायद्याने बंद केली जात नाही अथवा बंद होत नाही.
२. कंपनी चे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. वेगळा नोंदणी क्रमांक नाव व पत्ता असतो .
३. पब्लिक कंपनी मध्ये कमीत कमी ७ सभासद ( शेअर होल्डर) व जास्तीत जास्त कितीही असू शकतात.
४. कंपनी ला स्वतःचे शरीर नसते त्यामुळे डायरेक्टर कंपनी वतीने कंपनी चे संमती ने व्यवहार करतो.
५. लिस्टेड कंपनी ला स्टॉक एक्सचेंज चे काही नियम पाळावे लागतात . काही जाहीर निवेदने द्यावी लागतात जेणे करून कंपनी  चे व्यवहार  पारदर्शक असण्याची खात्री पटते.
६. लिस्टेड कंपनी वर बरीच बंधने असतात कारण ती भागधारकांना  उत्तरे देण्यास बांधील असते. त्यामुळे डायरेक्टर चे काम चोख असणे गरजेचे असते.
७ . प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नंतर पब्लिक कंपनी मध्ये रुपांतर करता येते. तसेच पब्लिक कंपनी प्रायव्हेट कंपनी मध्ये रुपांतर होऊ शकते .
आज इतकेच धन्यवाद !!!!
Visits: 466
error: Content is protected !!
WhatsApp chat