नमस्कार,
जागतिक नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकानी नवीन वर्षात काही नवीन गोष्टी करायचे ठरवले असेल . मी पण नवीन वर्षात जेवढे काही नवीन सांगता येईल , चांगल्या गोष्टी कशा आत्मसात करता येईल ते पहायचे ठरवले आहे.
डिसेंबर महिन्यात आपण कंपनी व प्रमोटर विषयी माहिती पाहिली
आज कंपनी च्या विविध प्रकारांची माहिती जाणून घेऊ.
सर्वांना ढोबळ मानाने माहिती असणारे प्रकार म्हणजे
१. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
२. पब्लिक कंपनी
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे ज्या कंपनी मधे शेअर होल्डर ( भागधारक) ची संख्या कमीत कमी २ व जास्तीत जास्त २०० असते. तसेच या कंपनी ला शेअर्स जाहीररीत्या सार्वजनिक रित्या विकता येत नाहीत
पब्लिक कंपनी मध्ये कमीत कमी ७ शेअर होल्डर ( भागधारक)असतात ,कमाल मर्यादा नाही .पब्लिक कंपनी आपले शेअर शेअर्स बाजारात व सार्वजनिक रित्या विकू शकते.
कंपन्या खालील प्रकारच्या असतात
१. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
२. वन परसन कंपनी ( प्रायव्हेट कंपनी चा एक प्रकार)
३. पब्लिक कंपनी
- लिस्टेड पब्लिक कंपनी
- अनलिस्टेड पब्लिक कंपनी
४. सेक्शन ८ , सामाजिक सुधारणा कार्य करणारी , चारिटी
५. फार्मर्स प्रोडूसर कंपनी
६. निधी कंपनी
ह्या व्यतिरिक्त पण कंपनी व पार्टनर शिप ( भागीदारी) ह्यांचे चांगले गुणधर्म एकत्र केलेली एलएल पी म्हणजे लिमिटेड लाएबलीटी पार्टनर शिप हा पण एक कंपनी सारखाच प्रकार आहे.
पुढील भागात आपण ह्या प्रत्येक कंपनी ची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
तुम्ही केलेले सर्व संकल्प पूर्ण होवोत . जो जे वांछील तो ते लाभो
Visits: 376