नमस्कार ,
या वेळी व्यक्त व्हायला जरा उशीर झाला कारण गौरी गणपती पूजन , नवरात्री उत्सव ह्या सगळ्या धामधुमीत आणि काही अडथळ्यांची शर्यत पूर्ण करता करता आज विजयादशमी चा सोनेरी दिवस उजाडला आलेल्या अडथळ्यांना पार करून त्यावर विजय मिळवणे हे आजच्या दिवशी माझ्यासाठी सीमोल्लंघन आहे .
आधीच्या ब्लॉग मध्ये कंपनी सचिव ह्या विषयी माहिती दिली आता कंपनी सचिव / कंपनी सेक्रेटरी ह्या विषयी अधिक माहिती आज जाणून घेऊ या.
कंपनी सेक्रेटरी/ कंपनी सचिव
कंपनी सेक्रेटरीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला अनेकांनी हा प्रश्न विचारला की ही कोणत्या विद्यापीठाची पदवी आहे? ह्याचे महाविद्यालय कुठे असते?
कंपनी सेक्रेटरी ही कोणत्याही विद्यापीठाची पदवी नाही. कंपनी सेक्रेटरी हे एक प्रोफेशनल क्वालीफिकेशन आहे . ही अशी एक विशेष योग्यता आहे जी आयसीएसआय या संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मिळवता येते.
आय सी एस आय हे विद्यापीठ नाही. ती एक संस्था आहे जी संसदे ने संमत केलेल्या कायद्या अंतर्गत अस्तित्वात आलेली आहे.
ही संस्था कंपनी सेक्रेटरी च्या परीक्षा घेते , त्या बाबत मार्गदर्शन करते. अतिशय कठीण अशी परीक्षा पद्धती असते त्यामुळे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३ ते ४ टक्के आहे . नवी दिल्ली येथे संस्थेचे मुख्यालय आहे . तसेच स्थानिक पातळीवर चॅप्टर आहेत . ज्या मार्फत ही संस्था काम करते म्हणून कोणतेही महाविद्यालय ह्या साठी नाही. स्थानिक चॅप्टर सर्व कामकाज पाहते.
कंपनी मंत्रालय यांचे तर्फे कंपनी कायदा अंतर्गत नियमांचे नियमन केले जाते आय सी एस आय ही मदत करते.
आजच्या साठी इती शब्द मर्यादा.
आता लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग चे निमित्ताने
दसऱ्याच्या शुभेच्छा
Visits: 643