आजही मला तो दिवस आठवतो जेव्हा बऱ्याच दिवसांचा अथक परिश्रमानंतर मी कंपनी सेक्रेटरी ची परीक्षा पास झाल्याचे प्रशस्तीपत्रक मिळाले. माझी सासर माहेर ची दोन्ही कुटुंबे अतिशय आनंदी झाली होती , का होणार नाहीत आम्ही सर्वांनी पाहिलेले एक मोठे स्वप्न पूर्णत्वास गेले होते.
पण खरी परीक्षा आता सुरु झाल्याची जाणीव मला झाली जेव्हा काही लोकांनी मला कंपनी सेक्रेटरी ची परीक्षा म्हणजे नक्की कोणती परीक्षा पास झालीस असे विचारले.तेव्हा जाणवले की cs ह्या प्रोफेशन ला त्याची योग्य ती ओळख मिळवून देणे गरजेचे आहे.म्हणून त्याचा एक भाग म्हणजे हा ब्लॉग प्रपंच
आपल्या पैकी बऱ्याच जणांना C A माहिती असतो कारण इन्कम टॅक्स नावाच्या बागुलबुवा पासून कसे वाचायचे किंवा त्याला योग्य तऱ्हेने कसे हाताळायचे याचे मार्गदर्शन करत असतो . सर्वसामान्य माणसाचा संपर्क नसतो , कंपनी , शेअर बाजार यांच्याशी संपर्क असणाऱ्यांना कंपनी सेक्रेटरी विषयी थोडी फार माहिती असते.
पूर्वी राजे लोक त्यांचा कडे सचिव नावाचे पद ठेवत असत . ते पद सांभाळणारा माणूस मुख्यत्वे राजाचा पत्र व्यवहार व दैनंदिन व्यवहारात लक्ष द्यायचा .पण आता कंपनी सेक्रेटरी ( कंपनी सचिव) चे काम त्याहून महत्त्वाचे झाले आहे.कोणतीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक कंपनी मध्ये कंपनी सेक्रेटरी ची एक महत्वाची भूमिका असते . कंपनी च्या अती महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये कंपनी सेक्रेटरी ची गणना होते व तशीच अतिशय महत्वाची जबाबदारी असते.
पुढील ब्लॉग मधे आपण ह्या विषयी अधिक जाणून घेऊ या.
Visits: 790