उशीरा पोस्ट केल्याबद्दल दिलगीर आहोत.कोरोना अतिरिक्त कामामुळे तारीख चुकली.

सुदामा: ” अरे मित्रा श्रीहरी आज भेटता येईल का रे तुझ्या त्या मित्राला  आपलं बोलणं झालं आणि लॉकडाऊन सुरू झाला बघ  पण आता थोडी बाहेर पडायला सुरुवात होते आहे तर पहा विचारून”
श्रीहरी: ” हो हो नक्कीच भेटू शकतो आम्ही दोघे ही भेटणारच होतो ये मग उद्या”
सुदामा व श्रीहरी दुसऱ्या दिवशी त्या मित्राच्या घरी जातात .
धनंजय: “या या मी तुमचीच वाट पाहत होतो:.
श्रीहरी : “हा माझा जुना मित्र सुदामा , ह्यालाच एल एल पी संबंधी माहिती हवी होती” .
धनंजय : “हो नक्कीच सांगतो चला चहा घेता घेता बोलू”.
“तर मी आणि माझ्या एका मित्राने एल एल पी सुरू केली आहे . ज्या  मधे आम्ही दोघे डेसीग्नेटेड पार्टनर आहोत म्हणजे आम्ही दोघे एल एल पी चे जबाबदार पार्टनर आहोत . ह्या व्यतिरिक्त अजून एक मित्र पण पार्टनर आहे पण तो नुसताच पार्टनर आहे .
म्हणजे जसे कंपनी मध्ये फक्त शेअर होल्डर असतात तसे , आणि आम्ही दोघे जसे डायरेक्टर शेअर होल्डर .”
“आम्ही तिघांनी आपल्या कुवतीप्रमाणे पैसे जमा केले व ते आमचे  एल एल पी चे जमा भांडवल झाले ज्याला कंट्री ब्युशन म्हणतात . आम्ही तिघांनी आपापला नफ्यात वाटा किती हे ठरवले तसेच इतर सर्व आवश्यक बाबी विचारात घेऊन एल एल पी  ऍग्रीमेंट झाले . त्यात कोणी काय काम करायचे , वाटा किती, तसेच एखाद्याला  पार्टनर म्हणून सामील करणे अथवा राजीनामा देणे ,कोणाचा मृत्यू झाल्यास काय ह्या सर्व आवश्यक बाबी व इतर सर्व आवश्यक असते त्यात नोंदल्या”.
सुदामा : “बर हे समजले पण कंपनी प्रमाणे ह्याच काम किचकट असते का ?”
धनंजय : “नाही नाही ही पार्टनर शिप आहे कंपनी नाही , पण कंपनी चे फायदे इथे लागू आहेत बरं , लिमिटेड लाएबीलिटी “
सुदामा :” हो मला सांगितले आहे श्रीहरी ने ह्या विषयी” .
धनंजय : “बर , पण काम सुरू केले की अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे . ती म्हणजे वार्षिक रिटर्न. जसे आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो तसेच अगदी काहीही धंदा झाला नसेल तरी एल एल पी चे वार्षिक रिटर्न म्हणजे
१.  वार्षिक रिटर्न
२. फायनान्स रिटर्न
जे अनुक्रमे मे महिन्यात आणि ऑक्टोबर महिना अखेरीस भरावे लागते.
व ते वेळेत न भरल्यास दंड वसूल केला जातो . आणि हो हे रिटर्न मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअरस् ह्याचाकडे भरायचे असते “.
सुदामा :” धन्यवाद तुम्ही खूप महत्वाची सूचना केलीत “.
धनंजय : “अहो खरं सूचना देणारा तर हा श्रीहरी आहे .”
श्रीहरी : “मी नावाप्रमाणे सूचना देणार , आपले कर्म आपल्यालाच करावं लागेल .”
धनंजय: “समजले हो पार्थ सारथी” 😄.
Visits: 676
error: Content is protected !!
WhatsApp chat