उत्पादक कंपनी / प्रोड्युसर कंपनी का आवश्यक आहे ?
आता शेती म्हणजे नुकसान असा गैरसमज झाला आहे . तरुण वर्ग नोकरी व शहर याकड़े आकर्षित झाला आहे.अन्नदाता शेतकरी शेती पासून दूर झाला तर भविष्य अधांतरी आहे
आता एकट्याने शेती करणे परवडणारे नाही त्यामुळे शेतकरी संघटीत होणे गरजेचे आहे. त्याला कायद्याचे संरक्षण व बळ सरकार ने फार्मर प्रोड्यूसर कंपनी (FPC) च्या रूपाने उपलब्ध करून दिले आहे.
उत्पादक कंपनी काय काय करू शकते
कृषी , बागकाम , हँडीक्राफ्ट, वन उत्पादन, बाय-प्रोडक्ट, सहायक प्रक्रिया उद्योग , फूलशेती, पशुसंवर्धन , वनीकरण ,मधमाशी पालन कराणारे, कॉटेज उद्योग, डेअरी, फूड प्रोसेस , रेशीम उद्योग उत्पादन, प्रोक्यूरमेन्ट,हार्वेस्टिंग सीडींग,पूलींग,हाताळणी, विपणन,मार्केटिंग,विक्री,निर्यात आयात,करू शकता. कंपनी ह्या सर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरील एखाद्या संस्थेकडून करून घेऊ शकतात , ऑरगॅनिक फार्मिंग ,पोल्ट्री फार्मिंग, फिश प्रोजेक्ट, आयुर्वेदिक मेडिसीन प्लांट, कोल्ड स्टोर, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, सहायक प्रक्रिया उद्योग , ऍग्रो टूरिझम, रिन्यूएबल एनरजी. जवळपास सत्तर प्रकार कृषी आणि संबंधित व्यवसाय ते करू शकतात.
उत्पादक कंपनी / प्रोड्युसर कंपनी चे उद्देश, कंपनी चे फायदे :
१. सभासदानी घेतलेल्या उत्पादनाचे उत्पादन केलेल्या किंवा कंपनीने त्यासाठी आयात केलेल्या अशा , हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, पुलिंग, हातळणी, विपणन, विक्री आणि निर्यात करु शकतात. तसेच कंपनी ह्या सर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरिल एखाद्या संस्थेकडुन करुन घेवु शकतात. कृषि उपकरणे, बियाणे, लाइव्ह स्टॉक किंवा शेतीसाठी इतर वस्तू सदस्यांना पुरवठा करणे हे काम उत्पादक कंपनी करते .
२. सभासदांनी बनवलेल्या उत्पादनाचे प्रोसससिंग ,प्रेझरविंग, ड्रायिंग,डीस्टीलिंग, कॅनिंग पॅकिंग
३. सभासदान साठी यंत्र उत्पादन विक्री ,सेवा , तंत्रज्ञान
४.प्रशिक्षण ,सभासदांनी एकमेक साहाय्य करणे
५. सभासदांचा उपयोगासाठी तांत्रिक मदत ,कौशल्य प्रशिक्षण ,शोध व डेव्हलोपमेंट
६. ऊर्जा निर्मिती वहन व वितरण , जमीन व पाणी यांचे सौवर्धन , संगोपन व प्राथमिक उत्पादन वाढ
७.प्राथमिक उत्पादनाचे इन्शुरन्स विमा शेती विमा , पीक विमा
८. नवीन तंत्रज्ञान विकास व परस्पर साहाय्य
९.सभासदांचा हितासाठी आवश्यक सोयी व साहाय्य करणे
१०.आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे
११. नाबार्डच्या विशेष योजनेच्या व्यतिरिक्त देखील अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळू शकतो.
१२. शहर व गाव या कंपनी मुळे जोडले जाऊ शकते. शहरातील आपलेच भाउबंध ग्राहक थेट या कंपनी द्वारे शेतकरी वर्गाशी जोडला जाईल त्याचा फायदा दोघांनाही होईल एक शेतकरी उत्पादक कंपनी म्हणुन या कंपनीस सहानुभुती आणि दर्जाची खात्री असल्याचा नैसर्गिक फायदा मिळेल.
१३. बाजारपेठेत कंपनी ची उत्पादने कंपनीच्या नावे ब्रँड ने थेट विक्री करुन मध्यस्थाना न देता वाटाघाटी करुन चांगला नफा मिळवता येईल. सर्व मार्केटिंग, जाहीराती ट्रेडमार्क ब्रँड तयार करता येईल. या विक्रीतुन येणारा नफा पुन्हा शेतकरी वाटुन घेतील
१४. गावातच रोजगार निर्माण होईल. नैसर्गिक आपत्तीपासुन येणारे संकट कमी होईल, कारण जरी सभासद सदस्यांकडे काही पिकले नाही तरी बाहेरुन आणुन त्यावर प्रक्रिया करुन उद्योग आणि रोजगार सुरु राहील.
१५. बी बियाणे खते सर्व मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याची सभासदांना माफक दराने उपलब्ध करून देता येतात .नवीन तंत्रज्ञान , प्रशिक्षण ,पाण्याचा योग्य वापर करून शेती उत्पन्न वाढवता येईल.